girgaon dhwaj pathak

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

गिरगांवचा पाडवा 

SVYP Drawing competetion

कै. सुनील निकम

चित्रकला स्पर्धा

pragati pratishthan project

सामाजिक संस्थांना

मदत

सैद्धांतिक भूमिका

 

सैद्धांतिक भूमिकेची आवश्यकता :

           चार लोक एकत्र आले कि गर्दी होते, पण जेव्हा हेच लोक विचार घेऊन काम करतात, तेव्हा ती संघटना होते. संघटनेचे मूळ अस्तित्व तिच्या सैद्धांतिक भूमिकेत असते. या वैचारिक पायामुळेच तिचे इतर संघटनांपासून वेगळे स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण होते. थोडक्यात, परिवर्तनशील समाजाचे शाश्वत मूल्य असे सैद्धांतिक भूमिकेचे वर्णन करता येईल.

'स्वयंप्रेरीत युवा , घडवेल समाज नवा' या प्रेरणेतून गिरगांवच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान ही युवा संघटना सतत कार्यरत आहे.

 

सामर्थ्य आहे चळवळीचे ।
जो जे करील तयांचे ।
परंतु तेथे भगवंताचे ।
अधिष्ठान पाहिजे।।

             आणि या समर्थांच्या उक्तीतील हे भगवंताचे अधिष्ठान स्वामी विवेकानंदांच्या रूपात प्रतिष्ठानने पाहिले आहे.

स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान ही युवकांची चळवळ असल्यामुळे स्वामी विवेकानंदांसारखा प्रगल्भ विचारांचा तेजस्वी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे. युवकांमधील सकारात्मक ऊर्जा रचनात्मक कार्याकडे वळवण्यासाठी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे.

 

              समतायुक्त, शोषणमुक्त आणि महिलांना आदराचे स्थान असलेल्या समाजनिर्मितीचा ध्यास स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान ने घेतला आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता प्रतिष्ठान पक्षीय राजकारणापासून दूर असलेली एक बिगरराजकीय चळवळ आहे. राजकीय पक्ष हे सुद्धा समाजाचा एक अभिन्न अंग आहेत. त्यामुळे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान च्या विविध कार्यक्रमात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सहर्ष स्वागत आहे. परंतु त्यांनी आपला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून या कार्यक्रमांत सहभागी व्हावे अशी प्रतिष्ठानची रास्त अपेक्षा आहे.

 

               स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान संस्था म्हणून कोणतीही निवडणूक लढवत नाही. परंतु प्रतिष्ठानचे कार्यकर्ते समाजाचाच एक भाग असल्यामुळे व्यक्तिगतरित्या कोणत्याही पक्षाचे काम करण्यास स्वतंत्र आहेत. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यास राजकीय पक्षाचा पदाधिकारी व्हायचे असल्यास किंवा निवडणूक लढवायची असल्यास त्याला प्रतिष्ठानच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. आणि या नियमास कोणीही अपवाद नसेल.